रेगडी पोलिसांनी केले ४ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
एस.के.24 तास
चामोर्शी : वाहनातून सागवानाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच रेगडी पोलिसांनी सापळा रचुन अडीच लाख रूपये किमतीचे वाहन व दिड लाख रूपये किमतीचे सागवानी लठ्ठे असा ४ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना आज १२ ऑगस्ट रोजी रेगडी येथे घडली.
याप्रकरणी विपीन विमल विश्वास वय,२५ वर्ष रा.गौरीपूर याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील आशीष गयाली हा फरार झाला. पोलिसांनी १.५० लाख रूपये किमतीचे सागवानी लठ्ठे तसेच २.५० लाख रूपये किमतीचे एम.एच.३३ टी ४१३५ या क्रमांकाचे वाहन जप्त केले.