चंद्रपूर येथील गौतम नगर मध्ये पत्नीला जिवंत जाळले उपचारादरम्यान मृत्यु ; पतीस अटक.
एस.के.24 तास
चंद्रपूर : महाकाली प्रभागातील गौतम नगर येथे पती शुभम भडके वय,२८ वर्ष याने पत्नी दीक्षा भडके वय,२७ वर्ष हिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना येथे घडली.दीक्षा हिचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी शहर पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पती शुभम भडके याला अटक केली आहे.
शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कमला समय्या भडके ७० वर्ष,रा गौतम नगर, चंद्रपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची नात दीक्षा शुभम भडके वय,२७ वर्ष ही आजी समवेत राहत होती.दीक्षाचा विवाह पाच वर्षांपूर्वी शुभम राजू भडके वय,२८ वर्ष याच्याशी झाला होता.मागील सहा ते सात महिन्यांपासून पती - पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने शुभम हा आई - वडिलांकडे वेगळा राहत होता. 5 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजता कमला भडके या बहिणीकडे गेल्या होत्या.
रात्री 9:00. वाजताच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी घरातून मला वाचवा,मला वाचवा असे जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज येत होता. दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता दीक्षा ही गंभीर अवस्थेत विव्हळत होती. तिचे अंगावरील कपडे व केस पूर्णत: जळालेले होते.
कमला भडके यांनी तात्काळ दीक्षाला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार सुरू असताना बुधवार 7 जानेवारी 2026 रोजी दीक्षाचा मृत्यू झाला.या प्रकरणी सुरुवातीला चंद्रपूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दीक्षाचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्यात कलम १०३ अंतर्गत खुनाचा गुन्हा वाढविण्यात आला आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शुभम राजू भडके याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके करीत आहेत.दरम्यान पतीने पत्नीला जिवंत जाळल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.

