मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली तर्फे मॅजिकशिट प्रदर्शनी व थ्रो बॉल स्पर्धा आयोजित.
एस.के.24 तास
गडचिरोली : मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली तर्फे मॅजिकशिट प्रदर्शनी व थ्रो बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेला अनेक मुलांनी सहभाग घेतला होता. जिंकणाऱ्या गटाला योग्य बक्षिस देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
मॅजिक बस तर्फे शाळेत सुरू असलेल्या सत्राबाबत माहिती देणे. सत्रात या तिसऱ्या वर्षात मुलांना जिवन कौशल्य-स्व व्यवस्थापन,सहानुभूती, सहकार्य,वाटाघाटी,अनुकूलता चे बारा सत्र देण्यात आले होते तर चॅलेंज अप चे पाच सत्र देऊन त्यांना समस्या कशा ओळखायचे, त्याची करणे,परिणाम व उपाय शोधुन ते कसे सोडवायचे ? या बाबत सांगण्यात आले होते.
या सर्व सत्राचे समारोप आणि मुलांनी शिकलेल्या जिवन कौशल्यचा वापर करून मुलांनी आपले चांगले जिवन जगावे,त्यांनी तयार केलेल्या मॅजिकशिट व चॅलेंज अप सत्रातील टास्क पूर्ण केल्याबद्दल प्रदर्शनी घेण्यात आली. तसेच मॅजिक बस तर्फे करियर अवेअरनेस आणि एस आर एच आर चे सत्र घेण्यात येणार आहे.या प्रदर्शनीचे आयोजन जिवन कौशल्य शिक्षक देवाजी बावणे यांनी केले.



