विविध कार्यकारी सहकारी संस्था मूल च्या वतीने मूल नगर परिषदेच्या नवनियुक्त नगरध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : दिनांक 8/1/26 ला विविध कार्यकारी सहकारी संस्था मूल च्या वतीने मूल नगर परिषदेच्या नवनियुक्त नगरध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मा.संदीपभाऊ कारमवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृ.ऊ.बाजार समिती मूल चे उपसभापती मा.राजेंद्र कन्नमवार मा.धनंजयजी चिंतावार उपस्थित होते.
त्यावेळी मा.एकताताई समर्थ नगरध्यक्ष मा. राकेशभाऊ रत्नावार उपाध्यक्ष न. प. मूल मा. प्रशांतभाऊ समर्थ नगरसेवक न. प. मूल मा. विवेकभाऊ मुत्यलवार नगरसेवक न. प. मूल यांचा संसथेच्या वतीने विजय झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तर मा. भोजराजभाऊ गोवर्धन याची बिनविरोध जिल्हा सहकारी बोर्ड चंद्रपूर येथे निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. आभार प्रदर्शन सचिव संजय बद्दलवार यांनी केले.

