नवरत्न महोत्सव वैचारिक जागरण महान लोकनायकांचा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : एज्युकेशन मुव्हमेंट सावित्रीबाई फुले महिला प्रबोधन संघ व बहुजन कला मंच ब्रह्मपुरी यांच्या वतीने नवरात्री निमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय बीएड कॉलेज सभागृह,ब्रह्मपुरी येथे नवरत्न महोत्सव वैचारिक जागरण महान लोकनायकांचा हा कार्यक्रम नवरात्रीच्या नऊ दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमा प्रसंगी पहिला दिवस राणी दुर्गावतीच्या कर्तबगारीवर आधारित घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदन नगराळे होते तर निकिता वासनीक, प्राध्या. वर्षा चंदनशिवे मार्गदर्शिका म्हणून विचारपीठावर उपस्थित होत्या.या प्रसंगी राणी दुर्गावती चे चित्र हुबेहूब साकार करण्यात येऊन तिच्या कर्तबगारीचे वर्णन अध्यक्ष व मार्गदर्शिका यांनी आपल्या विविध पैलू द्वारे मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पुनम घोडमारे यांनी तर आभार चंदा मगर यांनी उपस्थितांचे मानले.