झाडी बोलीच्या वर्धापनदिनी रंगले परिसंवाद व कविसंमेलन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी दिनांक,१५/१०/२५ बोलीच्या विविध कवितांची छटा,कविंनी गायलेल्या रचना आणि त्यात " झाडीबोलीची खोली " यावरच्या परिसंवादाने ब्रह्मपुरी झाडी बोली शाखेने झाडी बोली चळवळीचा वर्धापन दिन साजरा झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते ३६ व्या झाडी बोली साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष कवी डॉ.धनराज खानोरकर, अतिथी होते जगदिश मेहेर,कवी गणेश कुंभारे,कवी नरेंद्र ढोले.सर्वप्रथम शाखेचे अध्यक्ष कवी संतोष मेश्रामांनी कार्यक्रमाची भूमिका कथन केली.
याप्रसंगी झाडी बोलीचे प्राचीनत्व आणि या बोलीच्या संवर्धनासाठी काय केले पाहिजे?यावर परिसंवाद झाला.यानंतर कवी धनंजय पोटे,कवी गुलाब बिसेनसह सर्वांनी बोलीच्या रचना सादर केल्या.कार्यक्रमाचे संचालन व आभार शाखेचे सचिव कवी धनंजय पोटेनी केले.कार्यक्रम शिक्षक सहकारी पतसंस्थेची कार्यालयात पार पडला.