कवी - श्री.अमरदीप लोखंडे यांच्या लेखणीतून...
माझी जात जातीले खाते.
एस.के.24 तास दिनांक,१४/१०/२५
माझी जात जातीले खाते
खाता खाता वाकूल्या देते
चावता चावता गोड बोलते
पुढे जाणारा डोळ्यात सलते...1
करनी एक कथनी एक
समाजासाठी नाही नेक
कायदे पंडित ,विद्वान अनेक
पुस्तकी ज्ञानी मारती मेक...2
काम ,नियोजन सारे कुटिल
नेते निवडण्यात समाज जटिल
द्वेष बोलका सारे मुके
शुद्ध ओलावा कार्य सुके...3
समाजाच्या विभिन्न जाती
त्या तोडती अंतकरणातील नाती
समजून ऊमजून अडाणी झाले
म्हणून समाज मागे गेले...4
एक समाज राजकारणी बहू नेते
अनोळखी त्यांना लक्ष्मी देते
होत्याचे नव्हते होते
चतुर नीती कामी येते...5
खरा आनंद ज्ञानी पाडण्यात
त्यांच्यात ते धन्यता मानण्यात
हसत तर्क वितर्क सांगण्यात
सरड्यासारखे रंग बदलविण्यात...6
करून लंबे हात आपले
समाजाचे गळे कापले
आपलेच ओठ आपलेच दात
आपल्याच जातीले बसले खात
आपल्याच जातीले बसले खात...7
कवी - श्री.अमरदीप प्रल्हाद लोखंडे मु.पो.अ-हेरनवरगाव ब्रम्हपुरी जिल्हा.चंद्रपुर मो.८३०८००५८६८