चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न.
एस.के.24 तास
चामोर्शी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून त्या अनुषंगाने 12 ऑक्टोबर २०२५ रोज रविवारला दुपारी 3.00 वाजता वंचित बहुजन आघाडी गडचिरोलीची बैठक चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे पार पडली.
मागील साडेतीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहीर होणार असल्याचे प्रशासनाकडून संकेत मिळाले आहेत त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठका उमेदवार चाचपनी मोर्चा बांधणी सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडी सुद्धा संपूर्ण ताकतीने जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या संपूर्ण जागा लढणार आहे.
या अनुषंगाने आष्टी येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक बाबत सविस्तर चर्चा करून सर्व जागेवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार असून गावा गावात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देण्यावर भर देण्यात येईल व जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी चर्चा करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे, वंचित बहुजन आघाडी गडचिरोलीचे जिल्हा महासचिव मंगलदास चापले आष्टी येथील पदाधिकारी प्रकाश डोर्लीकर हरिदास मेश्राम,विनोद (छोटू)दुर्गे ,राहुल फुलझले, भास्कर झाडे, कवडू डोरलीकर ,अशोक साव ,जमनादास फुललेले ,चोखाची उंदीरवाडे ,एकनाथ खोब्रागडे, प्रेम कुमार गोडबोले, देविदास खोब्रागडे ,नेताजी डोंगरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.