वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी तळोधी(खुर्द) परिसरातील घटना.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१४/११/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी लगत असलेल्या तळोदी खुर्द येथील पांडुरंग गोविंदराव तिजारे हे स्व - मालकीची बैल जोडी चराईसाठी रस्त्याने नेत असतांना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. पांडुरंग गोविंदा तिजारे वय,75 वर्ष वर्ष राहणार तळोधी (खुर्द) हे जखमी झाले.
शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या आहेत.ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तळोधी (खुर्द )येथील पांडुरंग गोविंदा तिजारे वय,75 वर्ष हे नेहमीप्रमाणे आपली बैल जोडी चराईसाठी पटाच्या दांडा जवळ घेऊन गेले असता.अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. सोबत असलेल्या इतरही गुराख्यांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला.
वेळीच उपचारासाठी त्यांना आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नरड घटनास्थळी पोहोचले.वनरक्षक पाल मॅडम यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पंचनामा केला.जखमीला तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तळोधी खुर्द येथील सरपंच अनिल तिजारे यांनी केली आहे.

