जल ही जीवन संकल्पनेतून स्मार्ट गाव कळमना येथे उभारला वनराई बंधारा.
📍आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून साकारले पाणलोट संवर्धनाचे उदाहरण.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : स्मार्ट, स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळमना ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आदर्श ठरविला आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या प्रभावी घोषवाक्याला मूर्त रूप देत, आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून गावात वनराई बंधारा उभारण्यात आला आहे.
या उपक्रमात ग्रामस्थ, शिक्षकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते तसेच विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. बंधाऱ्याचे बांधकाम क्षमदानातून करण्यात आले असून, यामुळे गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सरपंच नंदकिशोर वाढई यांनी व्यक्त केला.
या उपक्रमात पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, ग्रामसेवक शुभांगी कवलकर, मुख्याध्यापक लोहे सर, विलास गिरसावळे सर, दिलीप निमकर सर, शालीक पेदोर सर, सुरेश गौरकार (गुरुदेव सेवा मंडळ), ज्येष्ठ नागरिक वामन क्षिरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई म्हणाले की, जल म्हणजेच जीवन. पाणी साठवणे, पाणी जिरवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. क्षमदानातून उभारलेला हा वनराई बंधारा भविष्यात पाण्याच्या टंचाईवर मात करण्यास निश्चितच हातभार लावेल.
यावेळी शामराव चापले, समाधान पेटकर, ज्ञानेश्वर ताजने, महादेव धांडे, शामा मुठलकर, पियुष गेडाम, सुदेश गेडाम, सुनील मेक्षाम, विशाल नागोसे तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित राहून या उपक्रमाला हातभार लावला.

