धानोरा तालुक्यातील मुरमाडी येथील थ्रेशर मशीनमध्ये अडकून निलंबित वनरक्षकाचा मृत्यू ; लाकुड तस्करीच्या प्रकरणात दाेनदा झाले होते निलंबन.

धानोरा तालुक्यातील मुरमाडी येथील थ्रेशर मशीनमध्ये अडकून निलंबित वनरक्षकाचा मृत्यू ; लाकुड तस्करीच्या प्रकरणात दाेनदा झाले होते निलंबन.


एस.के.24 तास


धानोरा : धानाची मळणी करताना थ्रेशर मशिनमध्ये अडकून निलंबित वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना 21 जानेवारी राेजी बुधवार ला दुपारी 1:00.वा.च्या सुमारास धानोरा तालुक्यातील मुरमाडी येथे घडली.सचिन देवराम हलामी वय,30 वर्ष रा.ईरुपटोला असे मृतकाचे नाव आहे. सचिन हलामी हा यापूर्वी वन विभागात वनरक्षक पदावर कार्यरत होता.  काही वर्षांपूर्वी निलंबनाची कारवाई केल्याने, तो स्वगावी ईरुपटोला येथे कुटूंबियासोबत राहत होता. 


उपजिविकेसाठी तो ईरुपटोला येथीलच उमाजी जनबंधू यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर चालक तसेच हमाल म्हणून काम करीत होता.सध्या सर्वत्र धान मळणीचे काम सुरू आहे. दरम्यान, बुधवारी मुरमाडी येथील शेतकरी विकास शेंडे यांच्या शेतात धान मळणी सुरू होती.मळणी सुरू असतांनाच तोल गेल्याने सचिनचा शरीर थ्रेशर मशीनमध्ये अर्धाअधिक शिरला व असह्य वेदनांसह तत्काळ त्याचा जीव गेला. 


क्षणात हा प्रकार घडल्याने त्याचे सहकारी हतबल अवस्थेत केवळ बघतच राहिले.मृतक सचिनच्या पश्चात पत्नी,मुलगी व बराच असा आप्तपरिवार आहे.सदर घटनेबाबत कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा उपपाेलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.विशेष म्हणजे सचिन हलामी हा वनविभागात वनरक्षक पदावर कार्यरत हाेता.


लाकुड तस्करीच्या प्रकरणात त्याच्यावर दाेनदा निलंबनाची कारवाई करण्यात आली हाेती. तेव्हापासून ताे ट्रॅक्टरवर काम करीत हाेता.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !