10 हजार रुपयांची लाच घेताना क्षेत्र सहायक महेश धामनगे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गडचिरोली पथकाने रंगेहाथ पकडले.

10 हजार रुपयांची लाच घेताना क्षेत्र सहायक महेश धामनगे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गडचिरोली पथकाने रंगेहाथ पकडले.


एस.के.24 तास


सिरोंचा : वन जमिनीवर अवैधपणे काम करत असल्याचे सांगत जप्त केलेल्या ट्रॅक्टरवर दंड कमी करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना सिरोंचा वन विभागातील एका क्षेत्र सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) गडचिरोली पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई बुधवारी (21 जानेवारी) रोजी कमलापुर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या राजाराम (खां) उपक्षेत्रात करण्यात आली.क्षेत्र सहायक महेश जयंतराव धामनगे (वय ४७) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर उपपोस्ट राजाराम (खां) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा तेलंगाणा राज्यातील असून राजाराम (खां) येथे काकांच्या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांच्या शेतीची मोबदला घेऊन मशागत करत होते. शेतात काम सुरू असताना दोन वनरक्षकांनी ‘वनजमिनीवर अवैध काम’ असा आरोप करून ट्रॅक्टर जप्त केला. नंतर राजारामचे क्षेत्र सहायक महेश धामनगे यांनी संपर्क साधून गुन्हा दाखल न करता कमी दंडाची तडजोड करण्यासाठी 25,000/- रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने तात्काळ ACB ला फोन करून तक्रार नोंदवली.

या तक्रारीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत सगणे यांनी दोन पंचांसह गोपनीय शहानिशा केली. १० हजार रुपयांची मागणी निष्पन्न झाल्याने सापळा रचला.विशेष नक्षलप्रभावित राजाराम सारख्या गावात महेश धामनगे यांनी लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या राजाराम (खां) व चंद्रपूर येथील निवासस्थानांवर गडचिरोली व चंद्रपूर युनिट्सकडून घराची झडती घेण्यात आली. 

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान,अप्पर पोलीस अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक विक्रांत सगणे,पो.नि.किरण बगाटे, पो.हवा.किशोर जौंजारकर व इ.टीमने केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !