उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,तालुका स्तरीय सामाजिक समावेशन बाबत... तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती,ब्रह्मपुरी अंतर्गत एक दिवसीय अनिवासी कार्यशाळा संपन्न.

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,तालुका स्तरीय सामाजिक समावेशन बाबत...


तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती,ब्रह्मपुरी अंतर्गत एक दिवसीय अनिवासी कार्यशाळा संपन्न.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : दिनांक :-21/01/2026 रोज बुधवारला तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती ब्रह्मपुरी च्या कार्यालयात ग्रामसंघ सामाजिक कृती उपसमिती व प्रभागसंघ सामाजिक कृती उपसमितीच्या पदाधिकाऱ्यांची सामाजिक समावेशन या  विषया अंतर्गत एक दिवसीय अनिवासी कार्यशाळा घेण्यात आली.


सदर कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून मा.सौ.कलावती रामटेके व मा.सौ.सुरेखा मेश्राम,ग्रामसखी - कृतीसंगम (CTC) उपस्थित होत्या.



प्रशिक्षणात खालील  विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

1) सामाजिक समावेशन म्हणजे काय ?

2) एकल महिलांची संकल्पना काय आहे ?

3) एकल महिलांची सामाजिक समावेशनसाठी उपाययोजना काय आहे ?

4) एकल महिलांना मुख्य प्रवाहात आणणे. 

5) दिव्यांग,घटस्फोटीत,विधवा,अपंग यांचा उमेद अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहायता समूहात समावेश करून त्यांना समाजात सामाजिक,आर्थिक दर्जा उंचावून मानसिक पाठबळ कसे देता येईल.

6) त्यांच्या करिता असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ, नोकरीमध्ये त्यांना असणारे 4% आरक्षण कशा पद्धतीने देता येईल इत्यादी विषयावर  सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले.


सदर कार्यशाळेला उपस्थित मा.श्री.मनोजकुमार मेश्राम,तालुका अभियान व्यवस्थापक, मा.श्री.अमोल मोडक,तालुका व्यवस्थापक - IBCB यांनी सदर विषयाबाबत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. 

कार्यशाळेकरिता कु.ज्योती साळवे,श्री.मंगेश वालदे,कु.सारिका बाहुरे व श्री.संदीप उईके,प्रभाग समन्वयक,श्री.दयानंद बाकमवार व श्री.छत्रपती बगमारे, समुदाय कृषी व्यवस्थापक,श्री.सोपान तडोसे,समुदाय पशु व्यवस्थापक

श्री.राकेश काळेवार,Block Anchor,सौ.अर्चना सहारे,प्रभागसंघ व्यवस्थापक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !