वीज पडून दोन सख्या जावा सोबत दोन मुली ठार.
गावावर शोककळा मृतकात माजी पंचायत समिती सदस्य.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक !एस.के.24 तास
वरोरा : तालुक्यामध्ये येत असलेल्या वायगाव भोयर येथे शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या चार महीलावर वीज पडून मृत्यू ओढवल्याची घटना घडली.
यात दोन सख्या जावा असून एक त्याच कुटुंबातील मुलगी आहे सविस्तर असे की आपल्या स्वतःच्या शेतात काम करीत असताना आज दुपारच्या सुमारास 4.00 वा. वायगाव येथील शेत शिवारात परिसरात जोर धार मुसळधार पावसाने हजेरी लावून पाण्यासह मेघ गर्जना सह वीज गर्जना सह जोरदार हजेरी लावली यात शेतात काम करीत असताना एकाएकी वातावरण बदलल्याने घराकडे निघत असताना अचानक महिलांवर वीज पडल्याने या महिलांचा जागीच मृत्यू झाला.
यात 1) हिरावती शालिक झाडे वय,४५ माजी पंचायत समिती वरोरा सदस्या,
2) पार्वता रमेश झाडे
3 ) मधुमती सुरेश झाडे वय,२०
4) रीना नामदेव गजभे वय,20
अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.
तर यात हिरावती व पार्वता या दोन संख्या जावा आहेत तर मधुमती त्याच कुटुंबातील आहे. तर रिना ही घरा शेजारी राहणारी मुलगी आहे. परिसरात शेतकरी शेतमजूर मध्ये भीती निर्माण झाले आहे. करिता या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिला असता येथील ठाणेदार,अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा स्टेशन चे पि. एस.आय,प्रवीण जाधव, किशोर पिरके,महादेव सरोदे कर्मचारी करीत आहे.