आज पासून तई येथे पाच दिवसीय धम्म शिबीर.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : त्रिरत्न बौद्ध महासंघ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तई/खुर्द यांच्या विद्यमाने लाखांदुर तालुक्यातील तई/खुर्द येथिल नागसेन बुद्ध विहार येथे दि. ४ ते दि. ८ मार्च या कालावधित पाच दिवसीय धम्मशिबीर आयोजीत करण्यात आला आहे.
या शिबीराचे नेतृत्व अमरावती येथिल धम्मचारीणी ज्ञानज्योती,धम्मचारीणी आर्यश्री,धमम्मचारीणी ज्ञानसखी,धम्मचारी कुशलरत्न,धम्मचारी श्रमणकेतु, धम्मचारी प्रज्ञाचंद्र, धम्मचारी जिनसागर हे "कलह विवाद सुत्त" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबीर निशुल्क असुन सर्व जाती-धर्मातील लोकांसाठी खुले आहे.
जीवन व विचारात आमुलाग्र बदल घडवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला धम्मराज्य स्थापन करण्यासाठी या शिबीरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तई/खुर्द यांच्या वतीने धम्मचारी जिनसागर - तुलानंदजी बारसागडे यांनी केले आहे.