तहसीलदार सतीश मासाळ यांची गुलमोहर बिर्याणी सेंटर व हिंदुस्थान हॉटेल वर धाड.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : इराण इराक अमेरिका युद्धामुळे सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे देशात गॅसचा तुटवढा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या परिस्थितीचा फायदा घेऊन काही गॅस सिलेंडर पुरवठा धारक,घरगुती गॅस हंड्याची साठवणूक करून बेभाव किमतीने त्याची विक्री करू शकतात. या शंकेने पूर्व खबरदारी घेत माननीय जिल्हाधिकारी व माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी,चंद्रपूर यांचे निर्देशानुसार तहसीलदार सतीश मासाळ यांचे मार्गदर्शनात.
ब्रह्मपुरी येथील गुलमोहर बिर्याणी सेंटर व हिंदुस्थान हॉटेल या दोन ठिकाणी ऐवद्य घरगुती गॅस वापराबाबत जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ नुसार महेंद्र रामटेके पुरवठा निरीक्षक यांच्याद्वारे धाड टाकून चौकशी अंतिम गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तालुक्यात ऐवद्य वापर रोखण्यासाठी हॉटेल,रेस्टॉरंट, व्यावसायिक प्रतिष्ठान,गॅस एजन्सी व अवैद्य साठवणूक केलेल्या गोदामची तपासणी करण्याकरिता तालुका प्रशासन सज्ज झाले असून अमित कांबळे पुरवठा निरीक्षण अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या नेतृत्वात महेंद्र रामटेके पुरवठा निरीक्षक, दिलीप मेश्राम, राजेश आंबाघरे पुरवठा लिपीक यांचे तालुकास्तरीय पथक तसेच मंडळ अधिकारी, तलाठी यांचे मंडळ निहाय ०७ पथक तयार करण्यात आले आहे.. या पथकास पोलीस विभागाचेही सहकार्य लाभणार आहे.
तालुक्यात ०४ गॅस एजन्सी असून त्यांच्याकडे घरगुती गॅसचा सध्या स्थिती पुरेसा साठा उपलब्ध असून नोंदणीकृत ग्राहकांना ओटीपी द्वारे गॅस सिलेंडर उपलब्ध होईल त्यामुळे जनतेने कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
गॅस हंड्यासाठी गॅस एजन्सी मध्ये अनावश्यक गर्दी टाळावी.
तसेच घरगुती गॅस बाबत कोणतीही अडचण आल्यास संबंधित गॅस कंपनीचे टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी अथवा तहसील कार्यालय ब्रह्मपुरी येथे पुरवठा शाखेत संपर्क करावा असे आवाहन सतीश मासाळ तहसीलदार ब्रह्मपुरी यांनी ब्रह्मपुरी तालुकावाशीयांना केली आहे.

