मुल तालुक्यातील डोंगरगाव येथे कारल्याची भाजी का बनवली या क्षुल्लक कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली.


मुल तालुक्यातील डोंगरगाव येथे कारल्याची भाजी का बनवली या क्षुल्लक कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली.


एस.के.24 तास 


मुल : कारल्याची भाजी का बनवली या क्षुल्लक कारणावरून नराधम मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे.मन सुन्न करणारी ही घटना जिल्ह्यातील मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली असून सुमित्रा पेटकुले वय,65 वर्ष असे मृतक आईचे नाव आहे.

आरोपी मुलाचे नाव जगदीश दशरथ पेटकुले वय,35 वर्ष आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री त्याच्या आईने कारल्याची भाजी केली होती. ही भाजी का केली म्हणून रागाच्या भरात सुमित्रा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दारूचे व्यसन आणि घरात मारहाण करणे यामुळेच त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वीच त्याला सोडून मुलांना घेऊन निघून गेली.त्यामुळे जगदीश हा आईसोबत राहत होता. 


गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जगदीश घरी आला तेव्हा आईने कारल्याची भाजी बनवली होती.कारले का बनविले म्हणून तो आईशी वाद घालू लागला आणि तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.या मारहाणीत आईचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस तात्काळ मूल गावात आले आणि नराधम जगदीश पेटकुलेला अटक केली. 


रात्री दारूच्या नशेत त्याने हे क्रूर कृत्य केले.घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली.माहिती मिळताच मुल पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !