रामनगर गडचिरोली येथील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू.


रामनगर गडचिरोली येथील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू.


एस.के.24 तास 


गडचिरोली : शहरातील रामनगरातील रहिवासी असलेली कांता अनिल मोहुर्ले वय,34 वर्ष ही महिला चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेली असताना तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही महिला सहकाऱ्यांसोबत ही महिला तिकडे गेली होती. पण अचानक ती खोल पाण्यात बुडाली. त्यामुळे हा अपघात आहे की आत्महत्या, हे स्पष्ट झालेले नाही.


प्राप्त माहितीनुसार, कांता मोहुर्ले ही महिला आपली मुले आणि काही सहकारी महिलांसोबत वैनगंगेच्या पैलतिरावर (चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत) गेली होती.जेवण करून त्या महिला वैनगंगेत आंघोळीसाठी उतरल्या होत्या असे सांगितले जाते. या दरम्यान कांता मोहुर्ले ही खोल पाण्यात गेली. 

ती गटांगळ्या खाऊ लागल्याने सोबत असलेल्या श्यामकला सुखेव किरंगे यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य न झाल्याने कांता पाण्यात बुडाली. नंतर पोलिसांच्या मदतीने नदीवरील पुलापासून काही अंतरावरून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

कांता अनिल मोहुर्ले हिच्यावर पूर्वी दारूविक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली गडचिरोली पोलिसात गुन्हे दाखल होते.त्यामुळे तिच्या मृत्यूबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. गडचिरोली पोलीस अधिक तपास करत आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !