मुल - मारोडा मार्गावरील बलकीदेव मंदिराजवळ दुचाकींची समोरासमोर धडक ; 3 जण ठार.

मुल - मारोडा मार्गावरील बलकीदेव मंदिराजवळ दुचाकींची समोरासमोर धडक ; 3 जण ठार.


एस.के.24 तास


मुल - मारोडा मार्गावरील बलकीदेव मंदिराजवळील वळणावर दोन वेगवान दुचाकींची समोरासमोर झालेली भीषण टक्कर तिघांच्या मृत्यूचे कारण ठरली. ही दुर्घटना मंगळवार,8 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30. वाजता च्या सुमारास घडली.


मिळालेल्या माहितीनुसार,MH 34 BX 8863 क्रमांक च्या दुचाकी वरून मारोडा येथील यश देवीदास शेंडे वय,22 वर्ष आणि त्यांचे वडील देवीदास कवडू शेंडे वय,45 वर्ष हे मुल येथून शेतीचे ऑनलाईन काम आटोपून मारोडा कडे जात होते. त्याच वेळी भादुर्णा येथील वासुदेव सहारे वय,54 वर्ष हे आपल्या दुचाकीवरून मुल च्या दिशेने येत होते बलकीदेवजवळील वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.


या धडकेचा जोर इतका प्रचंड होता की यश शेंडे आणि वासुदेव सहारे यांचा जागीच मृत्यू झाला,तर देवीदास शेंडे गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच मुल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमीला उपजिल्हा रुग्णालय,मुल येथे दाखल करण्यात आले.  


उपचार दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, दोन्ही वाहनचालकांविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास मुल पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्यंकटेश दोनाडे करीत आहेत.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !