अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०६/०५/२३ येथील विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ब्रह्मपुरी शहरातील नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे संस्थापक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निस्सीम भक्त कर्मयोगी मदनगोपालजी भैया यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात घेण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ डी .एच. गहाणे व प्राचार्य डॉ हर्षा कानफाडे यांनी प्रतिमांना माल्यार्पण करुन अभिवादन केले.कार्यक्रमाप्रसंगी डॉ सुभाष शेकोकर, डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ किशोर नाकतोडे,अधीक्षक संगीता ठाकरे, डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर, डॉ मोहन कापगते, डॉ भास्कर लेनगुरे, डॉ रतन मेश्राम, डॉ योगेश ठावरी, डॉ मुंगोले, डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, डॉ ज्योती दुपारे ,रोशन डांगे,सुषमा राऊत,प्रज्ञा मेश्राम,घनश्याम नागपूरे व इतरांनी पुष्पांजली वाहून आपली आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ. कुलजित गिल,डॉ.धनराज खानोरकर,प्रा.विनोद घोरमडे,प्रा.धिरज आतला,जगदिश गुरनुले प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.

