तालुका विधी सेवा समिती,व पंचायत समिती सावली तर्फे आयोजित " कायदेविषयक व मानव वन्यजीव संघर्ष जनजागृती शिबिर संपन्न.


तालुका विधी सेवा समिती,व पंचायत समिती सावली तर्फे आयोजित " कायदेविषयक व मानव वन्यजीव संघर्ष जनजागृती शिबिर संपन्न.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक एस.के.24 तास 


सावली : दिनांक,19/02/2026 गुरुवार नागरिकांना आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी, तसेच दैनंदिन जीवनातील कायद्यांची सोप्या भाषेत माहिती मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार मा. अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती, सावली आणि पंचायत समिती, सावली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच " कायदेविषयक व मानव व वन्यजीव संघर्ष बाबत जनजागृती शिबिर "  उत्साहात पार पडले.
  

मौजा चक पेडगाव (गवरा ला), ता. सावली येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे अध्यक्ष मा. दिवाणी व फौजदारी न्यायालय, सावलीचे श्री. ए.एस.शर्मा, सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र. श्रेणी) व मा.श्री मुक्तेश्वर कोमलवार गट विकास अधिकारी पंचायत समिती सावली यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आले. 


यावेळी व्यासपीठावर श्री.सचिन मुसळे पोलीस उप निरीक्षक,सावली श्री.विनोद धुर्वे वनपरीक्षेत्र अधिकारी सावली श्री.जाधव क्षेत्र सहायक,श्री.षडाकांत कवठे विधी स्वयंसेवक,श्री. प्रकाश लाडे,अधिवक्ता,श्री.ए.एन.गेडाम, अधिवक्ता,श्री रायपूरे ग्रामसेवक पोलीस पाटील, ग्रा प सदस्य उपस्थित होते.
  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री रायपुरे, ग्रामसेवक यांनी शिबिराच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. " सर्वसामान्यांना कायद्याची भीती न वाटता, त्याचा आधार घेता यावा यासाठी अशा शिबिरांची गरज आहे," असे त्यांनी नमूद केले.

    
या शिबिरात श्री ए.एस.शर्मा सह.दिवाणी न्यायाधीश, सावली यांनी घरेलू हिंसा व महिलांच्या संबंधित कायदे आणि मध्यस्थीचे महत्त्व " यांवर मार्गदर्शन केले.तसेच मानव व वन्यजीव संघर्ष याबाबत  निरसन करताना सांगितले की, "कायद्याचे ज्ञान असणे हे केवळ वकिलांचे काम नसून, ते प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. कायद्याच्या माहितीमुळे अनेक समस्या न्यायालयात जाण्यापूर्वीच सुटू शकतात." श्री विनोद धुर्वे वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी मानव व वन्यजीव संघर्ष याबाबत मार्गदर्शन केले. 


वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे याप्रमाणे जगंलाचे जतन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे असे अधोरेखित केले. श्री प्रकाश लाडे या तज्ज्ञ वकील आणि कायदेतज्ज्ञांनी महिलांचे हक्क, पोटगी आणि वारसा हक्क यांवर अधिकचे मार्गदर्शन केले.तसेच श्री सचिन मुसळे, पोलीस उप निरीक्षक यांनी वाहतुकीचे नियम, फसवणूक टाळण्याचे उपाय आणि सायबर कायदे व वाहतुकीचे नियम आणि दंड यावर सविस्तर चर्चा केली. 


पंचायत समितीचे श्री.एम.कोमलवार, गट विकास अधिकारी,यांनी गावाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावे माझी वसुंधरा अभियानात आपण भाग घेऊन विविध प्रकारचे वृक्षालागवड करून पर्यावरनाचा समतोल साधावा यांवर सखोल मार्गदर्शन केले.


या शिबिरात गावातील बहुसंख्य विद्यार्थी, नागरिक, महिला आणि युवकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नवनाथ वासेकर ग्रा प कर्मचारी कोंडेखल यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्री.प्रशांत भोयर पंचायत समिती सावली यांनी मानले. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिवाणी व फौजदारी न्यायालय,सावलीचे श्री.ए.एस.तेलंग,सहायक अधिक्षक आणि आशिष नामेवार तसेच कोंडेखल  ग्रा.प.सदस्य बोदलकर,पोलीस पाटील चौधरी, ग्रामसेवक श्री.रायपुरे  व गोरडवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !