10 कोटींचा मोहरा " देवजी " पोलिसांना शरण.
📍माओवादी चळवळीला मोठा धक्का, नक्षलवादाच्या खात्म्याची उलटी गिनती सुरू.
एस.के.24 तास
गडचिरोली : देशात माओवादविरोधी लढ्यातील एक ऐतिहासिक आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे.माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता तथा केंद्रीय समितीचा सदस्य देवजी उर्फ तीपिरी तिरुपती आणि त्याचा निकटवर्तीय सहकारी केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजु रेड्डी याने तब्बल 16 माओवाद्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची अत्यंत विश्वसनीय माहिती मिळाली.
या घटनेची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता असून या बातमीने देशभरात खळबळ उडाली आहे.देवजी हा माओवादी संघटनेचा प्रमुख असून माजी नेता बसवराजू नंतर त्याची निवड करण्यात आली होती.गेल्या अनेक वर्षांपासून देवजी सुरक्षा दलांसाठी सर्वात मोठं आव्हान ठरला होता. त्याच्या अटकेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी व्यापक मोहीम सुरू केली होती.
देवजीवर विविध राज्यांत शेकडो जवानांवर झालेल्या हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केल्याचा आरोप आहे.त्याच्यावर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मिळून दहा कोटी रुपयांहून अधिकचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
पाच राज्यांमध्ये मोठा प्रभाव : -
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या 1991 मधील अपहरणाची जबाबदारीही देवजीच्या नेतृत्वाखालील माओवाद्यांवर होती. या घटनेमुळे देवजी देशभरात कुख्यात झाला होता. माओवादी कारवायांमुळे प्रभावित झालेल्या महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये देवजीचा मोठा प्रभाव होता.
माओवादी चळवळीला मोठा धक्का : -
केंद्र सरकारने माओवाद संपुष्टात आणण्यासाठी ठरवलेल्या मुदतीपूर्वीच सुमारे 40 दिवस आधी देवजीने आत्मसमर्पण केल्याने माओवादी चळवळीला मोठा धक्काआहे. त्यामुळे माओवादविरोधी लढ्यात ही घटना निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माओवादी चळवळीला मोठा धक्का : -
तेलंगणा पोलिसांकडून या आत्मसमर्पणाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर या संपूर्ण कारवाईबाबत सविस्तर माहिती समोर येणार आहे.प्राथमिक माहितीनुसार, देवजी आणि त्याच्या सहकाऱ्यांचे आत्मसमर्पण हे माओवादी चळवळीला मोठा धक्का मानले जात असून, देशातील अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हा एक मोठा टप्पा ठरणार आहे.

