भारतमुक्ती मोर्चाचा नागपूर च्या संघ मुख्यालयावर महामोर्चा.
एस.के.24 तास
गडचिरोली : भारतमुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्च,राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व विविध संघटनाच्या वतीने नागपूरच्या संघ कार्यालयावर 22 फेब्रुवारीला ला राष्ट्रव्यापी महामोर्चा काढण्यात आला.या महामोर्चात देशभरातून पाच लाखाच्या वर लोक सहभागी झाली.या महामोर्चात इव्हीएम हटाओ देश बचाओ , वोट हमारा राज तुम्हारा नही चलेगा अशा प्रकारचे नारे लावण्यात आहे.अख्खी नागनगरी महामोर्चाने दुमदुमून निघाली.
या महामोर्चाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम व राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांनी केले .या महामोर्चा च्या मागण्या ओडीसा राज्यातील कटक येथील बामसेफचे ४२ वे व भारत मुक्ती मोर्चाचे १५ वे राष्ट्रीय अधिवेशन यांना परवानगी देणे . संपूर्ण खर्च ओडीसा सरकारने करावे.ईव्हीएम मशीन रद्द करावे , ओबीसी तसेच सर्व जातीची जातनिहाय जनगणना करावे अशा अनेक मागण्या आहेत .
या महामोर्चात गडचिरोली जिल्हयातून बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत,नरेंद्र शेंडे,डोमाजी गेडाम,अशोक वंजारी,प्रमोद बांबोळे, सुनंदा बांबोळकर,डॉ.उज्वला शेंडे,मनोज खोब्रागडे,कामराज लोखंडे या सहा दोनशेच्या वर कार्यकर्ते सहभागी झाले.

