आरमोरी तालुक्यातील चांभार्डा जाणाऱ्या मुख्य मार्गावर अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस चारचाकी वाहन ताब्यात
📍3 लाख 70 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; अखिल नार्लावार रा.मौशिखांब यास अटक.
एस.के.24 तास
आरमोरी : अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस स्टेशन आरमोरीच्या पथकाने अटक केली असून सुमारे 3 लाख 70 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 18 फेब्रुवारी रोजी दुपारी मौजा चांभार्डा जाणाऱ्या मुख्य मार्गावर करण्यात आली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश पोसन्ना तोरेम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:20 ते 1.30 वा.च्या दरम्यान संशयित वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विविध ब्रँडचे सुगंधित तंबाखूचे साठे आढळून आले.यात होला हूक्का शिशा तंबाखूचे 8 पॅकेट,ईगल हुक्का शिशा तंबाखूचे 400 ग्रॅमचे 6 पॅकेट (प्रत्येकी 10 लहान पाकिटांसह),200 ग्रॅमचे 10 पॅकेट तसेच मज्जा 208 तंबाखूचे 8 टिन डबे असा एकूण 20 हजार 410 रुपयांचा तंबाखू साठा जप्त करण्यात आला.
याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेले 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे महिंद्रा कंपनीचे बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस (क्र.MH.33 G 2284 हे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.असा एकूण 3 लाख 70 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी अखिल अशोक नार्लावार वय,36 रा.मौशिखांब ता.जि.गडचिरोली यास 18 फेब्रुवारी रोजी रात्री 10.03 वाजता अटक करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि.नरेश सहारे करीत आहेत.

