दिव्यांग व्यकीचा कार्यक्रम घोट येथे संपन्न.
सुरेश कन्नमवार - गडचिरोली
घोट : विधातालोक दिव्यांग संघटना घोट येथे दिव्यांग व्यक्तीचा कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन करव्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आदिवासी सेवक व साहित्यीक तथा माजी जि.प. सदस्या कुसुमताई अलाम ह्या होत्या तर उदघाटक म्हणुन सरपंच्या रुपाली दुधबावरे घोट , तर प्रमुख पाहुणे म्हणूनआशाताई वेलादी गडचिरोली मंगलाताई कुलसंगे , मुक्ता सगॉवार , येरमे रेगडी , अशोक बोदलवार , सचिन साखरकरआदि लाभले होते.
याप्रसंगी साहित्यिक कुसुमताई अलाम म्हणाल्या की दिव्यांग व्यक्ती करीता शासनाच्या विविध योजना दिव्यांग प्रमाणपत्र .एस.टी. मोफत प्रवेश , घरकुल योजनामधे प्राध्यान्य , नोकरीत पाच टक्के प्राध्यान्य , अपंगाना व्हिल चेअर ,महिण्यापोटी मानधान मिळतो या सर्व योजना शासन दिव्यांग व्यक्तीनी देत असल्या तरी यांची अमलबजावणी होतांना दिसत नाही म्हणुन अपंग निराधारांच्या समस्या घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे मांडणार असल्याची माहीती कुसुमताई अलाम यांनी सांगीतले.
परंतू दिव्यांग व्यक्तीनी एकसंघ संघटित होवून आपले अधिकार प्राप्त करावे. याप्रंसगी सरपंच रुपाली दुधबावरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल रंगारी यांनी केले. कार्यक्रमास सदर परिसरातील दिव्यांग व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते.

