शासकीय धान खरेदी केंद्रावर धान देऊनही धान उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही चुकारे नाही.

शासकीय धान खरेदी केंद्रावर धान देऊनही धान उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही चुकारे नाही.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपुरी : शासनाच्या आधारभूत धान खरेदी च्या नियमाच्या योजनेनुसार शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला धान खरेदी केंद्रावर  माहे  नोव्हेंबर २०२५ पासून शासनास विकला परंतु वर्ष बदलला तरी अजून पर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे चुकारे मिळालेले नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.


सध्या लग्न सीजन सुरु झाल्यामुळे नातेवाईकांच्या घरी लग्नाला जाणे, स्वतःच्या मुला - मुलींची लग्न कसे करावे या विवंचणेत शेतकरी आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे चुकारे लवकरात लवकर मिळावे म्हणून तालुक्यातील शेतकरी यांनी जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना ब्रह्मपुरीचे तहसीलदार यांच्या मार्फतीने लवकरात लवकर धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठीचे निवेदन दिले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !