प्रा.प्रकाश उके यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ संपन्न.

प्रा.प्रकाश उके यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ संपन्न.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


गडचिरोली : अवघ्या पंचक्रोशीत भौतिकशास्त्र विषयाच्या अध्यापनासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे सुमारे ३२ वर्षे कार्यरत असलेले कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्रा. प्रकाश उके दिनांक ३१ जाने. २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त महाविद्यालयात त्यांचा सेवानिवृतीपर सपत्नीक सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. 

       

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदाचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून  संस्थेच्या सदस्या तथा ब्रह्मपुरी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ. रीमा कांबळे,  संस्थेच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे, तसेच सत्कारमूर्ती प्रा. प्रकाश उके व सौ. प्रियंका उके  मंचावर उपस्थित होते. 

         

या प्रसंगी प्रा. प्रकाश उके यांचा शाल, पुष्पगुच्छ, बुद्धमूर्ती व इतर भेटवस्तू देऊन प्राचार्य डॉ. देवेश कांबळे तथा मंचावरील मान्यवर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. प्रकाश उके यांच्या सहवासातील अनेक आठवणीना आपल्या मनोगतातून सहृदय उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. देवेश कांबळे यांनी निवृत्ती नंतरच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि महाविद्यालयाशी  असलेले ऋणानुबंध कायम ठेवावे असे सूचित करून महाविद्यालयात आपले सदैव स्वागत असेल याची ग्वाही दिली.

          

सत्काराला उत्तर देताना प्रा. प्रकाश उके यांनी आपल्या प्रदिर्घ ३२ वर्षांच्या सेवाकाळातील अनेक चढउतार कथन करून महाविद्यालयातील विज्ञान विभागाचा झेंडा अटकेपार नेण्यासाठी त्यावेळी सर्वांनी केलेल्या कष्टाची आठवण करून दिली.


निरोपाच्या क्षणी त्यांच्या मनाची घालमेल कशी झाली ते सांगून आता यापुढे महाविद्यालयाचा रोजचा मार्ग अनोळखी वाटेल,असे सांगत त्यांनी आपल्या यशात त्यांच्या अर्धांगिनीचा मोठा वाटा असल्याची कृतज्ञतापूर्वक नोंद करून महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे,तथा संस्थेचे मनस्वी आभार मानले.

       

कार्यक्रमाचे संचालन सत्कार समिती प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले, तर आभार प्रा. नाशिक गेडाम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्कार समितीच्या सर्व सदस्यांनी तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास  महाविद्यालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !