नवभारत विद्यालय मुल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.

1 minute read


नवभारत विद्यालय मुल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : नवभारत विद्यालय, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तथा MCVC महाविद्यालय मुल यांच्या सौजन्याने आयोजित "वार्षिक स्नेहसंमेलन" 'बहर' पार पडले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ मुल चे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे होते. उद्घाटक म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ मुल चे सचिव अड. अनिलराव वैरागडे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राममोहन बोकारे मंडळाचे सदस्य, शशिकांत धर्माधिकारी मंडळाचे सहसचिव, अशोकराव झाडे मुख्याध्यापक / प्राचार्य, अल्का राजमलवार मुख्याध्यापिका कन्या विद्यालय हे होते.

        

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय वि तु नागपुरे साहेब आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तथा द्वीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अशोक येरमे यांच्या कलानिकेतन मंच ने स्वागतम् शुभस्वागतम या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले.

          

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अशोकराव झाडे यांनी केले.त्यांनी वर्षभरातील विविध उपक्रमाबद्दल माहिती देऊन अहवाल सादर केला. त्यानंतर मान्यवर मंडळीच्या हस्ते जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर निवड झालेल्या  विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार करण्यात आला.

          

कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड बाबासाहेब वासाडे यांनी विद्यार्थ्यांना चैतन्यशील व्यक्तिमत्त्व देण्यासाठी सर्वांगीण विकास आवश्यक असतो असे प्रतिपादन केले.संस्थेचे सचिव अँड.अनिलराव वैरागडे यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास म्हणजे सर्वांगीण विकास होय असे सांगितले.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन,निलेश माथनकर आणि प्रतिमा उमक यांनी केले तर  आभारप्रदर्शन माधुरी तलांडे यांनी मानले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !