मुल तालुक्यातील चांदापूर हेटी येथे आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांकडून ९ लाख 48 हजार रुपये चोरबिटी बियाणे जप्त.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : तालुक्यातील जुनासुर्ला येथे तीन वर्षां पासून रवीकुमार गोटेपट्टी (रेड्डी) हा आंध्र प्रदेशातून आलेला इसम परिसरातील शेतकऱ्यांना भुलथापा देऊन जमिनी भाडेतत्त्वावर घेणे,शेतात चोरबिटीचा वापर करीत असल्याची माहिती गुणनियंत्रक पथकाला मिळाली.
पथकाने छापा टाकून ९ लाख ४८ हजार रुपये किमतीचे तब्बल पाच क्विंटल कापसाचे चोरबिटी बियाणे जप्त करून गुन्हा दाखल केला.या कारवाईने चोरबिटी बियाणांचा वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.