सिरोंचा वन विभागा अंतर्गत कमलापुर हत्ती चक्क १२ दिवसांच्या हक्काच्या वैद्यकीय सुट्टीवर.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सिरोंचा : गडचिरोली वनवृत्त सिरोंचा वन विभागा अंतर्गत कमलापुर वनपरिक्षेत्रमध्ये कार्यरत असलेले अजित,मंगला,बसंती,रुपा, राणी,प्रियांका,गणेश,लक्ष्मी अशा आठ हत्तींचे " चोपिंग " असल्याने त्यांना हक्काच्या सुट्टीवर पाठवले जात आहे.
दरवर्षी या काळात हत्तींना आराम देऊन त्यांच्या पायांना ‘" चोपिंग " केले जाते, असे कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चोके म्हणाले.बारा दिवस चालणाऱ्या या " चोपिंग " मध्ये हत्तींची विशेष काळजी घेतली जाते. त्यादरम्यान त्यांच्या प्रकृतीची तपासणी व रक्त तपासणी केले जाते. असे कमलापूरचे - पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश येमचे म्हणाले.