जिवती तालुक्यातील आसापूर जि.प.उ.प्रा.शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक चक्क दारू ढोसून शाळेत ; पालकांनी दिला चोप.
एस.के.24 तास
जिवती : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेचे पुरते तीन तेरा वाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवर जीवती तालुक्यातील आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक चक्क दारू ढोसून शाळेत प्रवेश केला. झिंगाट अवस्थेत दोघेही पालकांना दिसून आले. संतापलेल्या पालकांनी या दोघांना जाब विचारीत धारेवर धरले.तसेच शिक्षकासोबत आलेल्या एका तरुणाला महिलांनी चोप दिला.
पालकांनी या दोघांचा व्हिडीओ बनविला. हा व्हिडिओ समाजमाध्यमात सार्वत्रिक झाला आहे. या तळीराम शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी पालक, विद्यार्थी यांनी केंद्रप्रमुखा मार्फत संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.