वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार ; वाघाच्या हल्ल्यात यावर्षीचा 42 वा मृत्यू.
एस.के.24 तास
चिमुर : चिमूर तालुक्यातील शंकरपूर-कवडशी रस्त्यालगत शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेषराव नथु झाडे वय,52 वर्ष या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शेषराव झाडे हे सोमवारी (दि.८) सायंकाळी शंकरपूर येथे बाजारहाट करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचा संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी सकाळी शोध घेण्यास सुरुवात केली. दिवसभर शोध घेऊनही ते न सापडल्याने,मंगळवारी सायंकाळी गावकऱ्यांनी शेतशिवारात संयुक्त शोध मोहीम सुरू केली. दरम्यान त्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

