मुल तालुक्यातील डोंगरगाव येथे संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती साजरी.
एस.के.24 तास
मुल : दिनांक,०८ डिसेंबर २०२५ रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत,वारकरी संप्रदायातील,जगतगुरू तुकोबारायांच्या प्रभावळीतील आणि त्यांच्या विचारांना पुढे नेणारे महान,परमपूज्य संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती मोठ्या उत्साहाने बहुसंख्य लोकांच्या उपस्थित तेली समाज समिती डोंगरगांव तालुका - मूल जि.चंद्रपूर च्या वतीने साजरी करण्यात आली.
या जयंती सोहळ्यास प्रमुख वक्ता म्हणुन डॉक्टर. श्री गोकुल कामडी सर,अध्यक्ष म्हणुन श्री.श्रीधर पाकमोडे सामाजिक कार्यकर्ता,राजोली, दीपप्रज्वलन श्री.ढगे सर आणि प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.किरण पोरेड्डीवार समाजिक कारकर्ता, डोंगरगाव,श्री.शंकर शेंडे पो.पा.डोंगरगाव,उईके सर,गंगाधर पा.मुंगमोडे, कवडुजी मडावी,पुरुषोत्तम संतोषवार,डॉक्टर रवींद्र चान्नावार, विजय पाकमोडे, मधुकर पा. मुंगमोडे, चांदुजी बनसोड,रत्नाकर शेंडे, दिलीप वल्के, तुकाराम पेटकुले, बंडू मांदाले, विनोद ठाकरे, आणि बहुसंख्य तेली समाज बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी श्री. जगनाडे महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माळ्यार्पण करून करण्यात आली.
मंचावर उपस्थित मान्यवारांनी श्री. संताजी जगनाडे महाराजांचे विचार,त्यांचे जीवन चरित्र,त्यांचे समाजासाठी असलेली वैचारिक क्रांती आणि विचार, संताजी महाराजांची गाथा,संत तुकाराम महारांजाची अभंग यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन तेली समाज समिती डोंगरगांव यांच्या वतीने श्री.पुरुषोत्तम आ.वासेकर यांच्या अध्यक्षेखाली करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रांसंचालन देवानंद वासेकर,श्रुतिका सोनुले आणि सहकार्य कमलेश वासेकर,गणेश टिकले यांनी केले.
या कार्यक्रमाची सांगता ही संत जगनाडे महाराज यांच्या भव्य पालखी सोहळा त्यात संताजीची भूमिका हरिदास चिरके आणि त्यांची पत्नी यमुनाबाई यांची भूमिका सौ. दीपिका चिरके यांनी केली.त्यानंतर सस्नेह भोजनाने सांगता करण्यात आली.



