चांदली येथे भव्य टेनिस बॉल नाईट अंडरआर्म क्रिकेट सामन्यांचे उदघाटन.
📍खिलाडीवृत्ती जोपासने ही काळाची गरज. - नितीन गोहने
एस.के.24 तास
सावली : विधिमंडळ काँग्रेस गटनेते, लोकलेखा समिती अध्यक्ष तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मान.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चांदली (बुज) येथे भव्य क्रीडा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.द अहिल्या वारियर्स क्रिकेट क्लब,चांदली बुज यांच्या सौजन्याने भव्य टेनिस बॉल नाईट अंडरआर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले.
या विशेष क्रीडा उपक्रमात स्थानिक तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रात्रीच्या प्रकाशात रंगणारे हे सामने गावातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ देणारे ठरले. स्पर्धेत विविध संघांनी सहभाग नोंदवून मैत्रीपूर्ण वातावरणात क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी द अहिल्या वारियर्स क्रिकेट क्लब चांदली बुज यांनी परिश्रम घेतले. वाढदिवसानिमित्त गावात खेळांच्या माध्यमातून उत्साह व ऐक्याचे वातावरण निर्माण झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.
उदघाटणा प्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,माजी सभापती प.स.विजय कोरेवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद भैसारे,चांदली येथील सरपंच विठ्ठल येगावार,उपसरपंच मनिषाताई मोहुर्ले,युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष नितीन दुवावार,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते विलास येगंटीवार,ग्राम काँग्रेस कमेटी चांदलीचे अध्यक्ष विकास उपरेड्डीवार,उपसरपंच मीना मोहुर्ले,बोथलीचे उपसरपंच नरेश पाटील गड्डमवार,पोलीस पाटील चिंतामण बालमवार,विक्की येगंटीवार,शिला गुरुनुले,ग्रामपंचायत सदस्य योगिता संतोषवार,श्रीकांत बहिरवार,संदीप सायत्रावार आदी उपस्थित होते.

