भाजपात ४ डॉक्टर च्या प्रवेशाने आमदार,देवराव होळी यांच्या पाया खालची वाळू सरकायला लागली.
★ शेवटी खासदार - आमदार मनोमिलन.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली - चिमुर लोकसभा निवडणुकी पूर्वी पासुनच खासदार अशोक नेते आणि आमदार डॉ.देवराव होळी यांच्यामधे वैर निर्माण झाले होते.अलग अलग- बॅनर, सभा संमेलने सुरू होती.एवढेच नव्हे तर चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची उमेदवारी मलाच मिळाली पाहिजे यासाठी आमदार डॉ.देवराव होळी प्रयत्नशील होते.
अखेर खासदार अशोक नेते यांना चिमुर लोकसभेची भाजपाची उमेदवारी त्यांनाच मिळाली.त्यातही एका महिन्यातच काँग्रेस चे दिग्वज नेते भाजपाच्या गळाला लावल्यास खासदार,अशोक नेते यशस्वी ठरले.
यात एक नव्हे तर चार चार डॉक्टरानी भाजपात प्रवेश केल्यामुळे आमदार डॉ.देवराव होळी यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली व आमदार डॉ.देवराव होळी यांनी नरमती भुमीका घेऊन त्यातही वरिष्ठाची तमी पाहता शेवटी खासदार, अशोक नेते आणि आमदार देवराव होळी यांचे अखेर मनोमिलन झाले.
आमदार होळी आपल्या कुटुंबासहीत खासदार नेते यांना तिकीट मिळाली म्हणुन त्यांचे अभिनंदन केले तर दोघेही मिळुनच प्रचाराच्या निमित्याने प्रमुख व्यक्तीच्या भेटीगाटी एकत्रीपणे निभावल्या. पुढे एकत्रीत पणे प्रचारही करणार असल्याचे ऐकविल्या जात आहे.