वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा हितेश मडावी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा हितेश मडावी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. 


मुनिश्वर बोरकर - गडचिरोली


गडचिरोली : वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य तथा नागपूर विभागाचे निरीक्षक कुशलभाऊ मेश्राम यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले 

यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार प्रा हितेश मडावी , जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, उपाध्यक्ष विलास केळझरकर, क्रिष्णा रोहनकर,  तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, शोभा शेरकी, जावेद शेख, तुळशिराम हजारे, आदि सहीत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित च्या कार्यालयाचे उदघाटन होताच सर्व नेते मंडळी प्रचारास लागले. वंचित चे २०१९ मधील उमेदवार डॉ. गजभे सुद्धा प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत . मागील निवडणुकीत मिळालेली सव्वा लाख पेक्षा दोन पट मते वंचितला नक्कीच मिळणार व प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांचे गणीत बिघडवणार असे वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू ठेभुर्णे यांनी सांगीतले .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !