पिंपळगाव भोसले येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथे राजू देवढगले हा शेतकरी आपल्या शेतीतील काही कामे आटोपून घरी परत येत असतांना फाट्याजवळील पगानीच्या गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला असता त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.सदर घटना आज दुपारी अंदाजे 2:30.वा. दरम्यान घडली.सध्या त्यांच्यावर चेहऱ्याला जबर मार असल्यामुळे आस्था हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे उपचार सुरू आहे.
तसेच दुसऱ्या शेतक-यावर सुद्धा त्याने हल्ला करून जखमी केले अशी चर्चा सुरू आहे.त्यामुळे पिंपळगाव भोसले व सभोवतालच्या परिसरात जंगली प्राण्यांचा शिरकाव गावाशेजारी झाला असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जंगली प्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे.

