नागभीड येथे मनोरुग्ण महिलेवर अतिप्रसंग करुन व्हिडीओ वायरल करणारे आरोपी तीन तासात अटक.
एस.के.24 तास
नागभीड : दिनांक २३ ऑगस्ट, २०२४ रोजी १०:०० वाजता सुमारास पोलीस स्टेशन नागभीड हद्दीत सोशल मिडीया व्हॉटसअपवर आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाल्याचे माहिती पडताच नागभीड पोलीसांनी त्याची तात्काळ दखल घेवुन व्हिडीओ मधील पिडीत महिलेची शोध घेवुन तिची ओळख पटविण्यात आली.
लागलीच सदर व्हिीडीओ मधील आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पोलीस पथके तयार करुन आरोपीचा शोध घेतला असता सदर गुन्हयात सामील सर्व आरोपीना ताब्यात घेवुन विचारपुस केली.
सदर गुन्हा केल्याचे सांगुन सदर व्हिडीओचे घटनास्थळ नागभीड बस स्थानकातील मुत्रीघर मधील असून दिनांक १२/०८/२०२४ च्या मध्यरात्री दरम्यान पिडीत/मनोरुग्ण महिलेस एकटी असल्याचे पाहुन तिला मुत्रीघरात नेवुन तिच्या सोबत एका आरोपीने बळजबरीने अतिप्रसंग केला त्यावेळी त्याच्यातील दुसऱ्या आरोपीने मोबाईलवर त्याचे व्हिडीओ काढले असुन इतर आरोपींनी गुन्हा करण्यास सहकार्य केले.