कोरपना शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष,अमोल लोंढे यांच्या विरोधात 6 वी च्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल.
एस.के.24 तास
कोरपना : कोरपना तालुक्यातील एका खासगी शाळेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कोरपना शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल लोंढे यांच्या विरोधात सहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेनंतर पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते.त्यामुळे मंगळवारी सायंकाळी पालक व शिक्षकांनी कोरपना पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावून संताप व्यक्त केल्याने काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.