दहा वर्षात अपक्ष,आमदार किशोर जोरगेवार यांना महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांनी त्यांची कोंडी केली.
★ भाजप मध्ये गटबाजी अहीर यांचे समर्थन, मुनगंटीवार विरोधात.
एस.के.24 तास
चंद्रपूर : दहा वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सतत निष्ठा आणि पक्ष बदलवणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देऊन चंद्रपुरातून उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये गटबाजी बघायला मिळत आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांचा गट उघडपणे जोरगेवार यांचे समर्थन करीत आहे, तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या प्रवेश व उमेदवारीला विरोध केला आहे.