शिवजयंती उत्सव समिती तर्फे प्रकाश मेश्राम यांना आर्थिक मदत.

शिवजयंती उत्सव समिती तर्फे प्रकाश मेश्राम यांना आर्थिक मदत. 


अमरदीप लोखंडे,सहसंपादक


ब्रह्मपुरी : 26 जानेवारी 2026 ला प्रजासत्ताक दिन व एनसीसी परेडला उपस्थित राहण्यासाठी नेवजाबाई हितकारणी विद्यालयात 14 वर्ष वयाचा वर्ग 09 मध्ये शिकत असलेला यश प्रकाश मेश्राम हा भालेश्वर येथील मित्राला सोबत घेऊन स्कुटीने जात असताना कुर्झा बोंडेगाव रस्त्यावरती सकाळी 6:00.वाजे दरम्यान राधाकृष्णनगरी जवळ विरुद्ध येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. 


त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाला असता ब्रह्मपुरी येथील आस्था हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना दिनांक,06/03/2026 रात्रौ.1:00.वा.त्याच्यावर काळाने झडप घातली आणि 40 दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या यश ने अखेरचा श्वास सोडला.प्रकाश मेश्राम याच्या पदरी अपयश पडले.


एकुलता एक मुलगा लाखो रुपये उपचारासाठी खर्च होऊनही मरण पावल्यामुळे प्रकाश मेश्राम आर्थिक संकटात सापडला आहे याची जाण ठेवून अ-हेरनवरगांव येथील शिवजयंती उत्सव समिती चे सक्रिय कार्यकर्ते संजय ढोरे,राजेश ठेंगरे,मुन्ना टेंभुरकार,व इतर सभासद,श्रीकांत पिलारे यांनी प्रकाश मेश्राम यांच्या घरी जाऊन सांत्वना भेट घेतली आणि समितीतर्फे आर्थिक मदत त्यांच्या स्वाधीन केली. 


समितीच्या या उदात्त हेतूची प्रकाश मेश्राम यांनी कृतघ्नता व्यक्त केली.गावातील हा पहिलाच एक अभिनव उपक्रम असून गावातील मंडळां साठी प्रेरणा व मार्गदर्शक ठरणारा आहे असे आर्थिक मदत देतांना ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिलारे यांनी अमरदीप लोखंडे यांचेशी संवाद साधताना बोलून दाखविले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !