गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकुण 20,70,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.
एस.के.24 तास
सिरोंचा : गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांचेकडून अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. यावरुन काल दिनांक 21/05/2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री.संदेश नाईक यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन उपविभाग सिरोंचा अंतर्गत उपपोस्टे झिंगानूर हद्दीतील मौजा झिंगानूर येथे सदर कारवाई करण्यात आलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मौजा झिंगानूर येथे राहणारा इसम नामे कारे कोरके गावडे, वय 38 वर्षे, रा. झिंगानूर याने अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने दारु घरात साठवून ठेवलेली आहे अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा श्री. संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा व उपपोस्टे झिंगानूर यांचे संयुक्त पोलीस पथक मौजा झिंगानूर येथे रवाना करण्यात आले.
नमूद संशयीत इसम नामे कारे कोरके गावडे, वय 38 वर्षे, रा. झिंगानूर यांचे घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन पोलीस पथकाने त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या घरात 90 एम.एल. मापाचे रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीचे 124 खाकी रंगाचे कागदी बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये 100 नग प्रमाणे एकूण 12,400 नग सिलबंद बॉटल, प्रती बॉक्स किंमत 10,000/- रु. प्रमाणे एकूण 12,40,000/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
पोलीसांनी सदर देशी दारुच्या मुद्देमालाबाबत कारे गावडे यांचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता, त्याने सदरची देशी दारु ही 1) समया बापू दुर्गम, वय 32 वर्षे व 2) सडवली बापू दुर्गम, वय 32 वर्षे दोघेही रा. झिंगानूर यांची असून त्यांचे घरी सुद्धा विक्रीकरीता अवैधरित्या देशी दारुची साठवणूक करुन ठेवलेली आहे असे सांगितले.
सदर माहितीच्या आधारावर पोलीस पथक पंचांसह समया बापू दुर्गम व सडवली बापू दुर्गम यांच्या घरी गेले असता, पोलीस पथक आल्याचा सुगावा लागल्याने दोघेही आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. पोलीसांनी त्यांच्या घराच्या अंगाणामध्ये उभे असलेले चारचाकी महिंद्रा बोलेरो वाहन क्र.AP -15-M-1088 या वाहनाची तपासणी केली.
वाहनामध्ये 1) 90 एम.एल. मापाचे रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीचे 48 खाकी रंगाचे कागदी बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये 100 नग प्रमाणे एकूण 4,800 नग सिलबंद बॉटल, प्रती बॉक्स किंमत 10,000/- रु. प्रमाणे एकूण 4,80,000/- रुपये व 2) एक चारचाकी वाहन महिंद्रा बोलेरो, अंदाजे किंमत 3,50,000/- रु. असा एकूण 8,30,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर दोन्ही ठिकाणी मिळून आलेल्या देशी दारुबाबत आरोपी नामे कारे कोरके गावडे याचेकडे कसून चौकशी केली असता, त्याने सदर देशी दारु रुपेश कांरेगला, वय 32 वर्षे, रा. देचलीपेठा ता. अहेरी, जि. गडचिरोली हा पुरवठा करत असल्याबाबतचे सांगितले.
चारचाकी वाहनासह सदर दोन्ही ठिकाणावरुन मिळून आलेला एकूण 20,70,000/- रुपयांचा देशी दारुचा मुद्देमाल पोलीसांनी घटनास्थळावरुन जप्त केला असून संबंधीत घटनेच्या अनुषंगाने उपपोस्टे झिंगानूर येथे कलम 65 (ई), 83 म.दा.का. अन्वये
आरोपी नामे : - 1) कारे कोरके गावडे वय,38 वर्ष
2) समया बापू दुर्गम वय,32 वर्ष
3) सडवली बापू दुर्गम वय,32 वर्ष तीघेही रा.झिंगानूर व
4) रुपेश कांरेगला वय,32 वर्षे रा.देचलीपेठा
ता.अहेरी, जि.गडचिरोली यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्रातील आरोपी नामे कारे कोरके गावडे याला अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि.अभिजीत घोरपडे, उपपोस्टे झिंगानूर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.एम.रमेश,अपर पोलीस अधीक्षक,अहेरी श्री.सत्य साई कार्तिक,
उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री.संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे झिंगानूरचे पोउपनि. अभिजीत घोरपडे व अंमलदार, उपपोस्टे बामणीचे सफौ/नरेंद्र दुबे, नापोअं/सचिन जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथील पोहवा/राजु चव्हाण, चापोहवा/आनंद खोब्राागडे व पोअं/नईम शेख यांनी पार पाडली.