मुल तालुक्यातील करवन येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार ; बारा दिवसात नऊ बळी.
एस.के.24 तास
मुल : मुल तालुक्यातील करवन येथे वाघाच्या हल्ल्यात बंडू उराडे या इसमाचा मृत्यू झाला.सदर घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.बारा दिवसात वाघाने एकूण नऊ जणांचा बळी घेतल्याने भिती व दहशतीचे वातावरण आहे.
मुल तालुक्यात सध्या वाघाने धुमाकूळ घातला आहे. तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने ग्रामस्थ जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात आणि वाघाचे लक्ष ठरत आहे.
करवन येथील बंडू उराडे हा जंगलात तेंदुपत्ता सोडण्यासाठी गेला होता.यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला असता त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व वन अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.