श्रीहरी बालाजी देवस्थान,चिमुर येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण व " बाल संगम " कार्यक्रम संपन्न. 📍" बाल संगम " निमित्य आयोजीत वेशभूषा स्पर्धेत 26 बालकांचा सहभाग,बालकांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा उत्साह व आनंद द्विगुणित.


श्रीहरी बालाजी देवस्थान,चिमुर येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण व " बाल संगम " कार्यक्रम संपन्न.


📍" बाल संगम " निमित्य आयोजीत वेशभूषा स्पर्धेत 26 बालकांचा सहभाग,बालकांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा उत्साह व आनंद द्विगुणित.


पुंडलिक गुरनुले - चिमुर तालुका प्रतिनिधी 


चिमूर : क्रांती भूमितील श्रीहरी बालाजी देवस्थान येथे दर मंगळवारला "सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण" कार्यक्रम होत असते. दिनांक 06/05/2025, मंगळवार ला सकाळी ठीक 8.15 ते 9.15 या कालावधीत संपन्न झाला. 

             

यात " बाल संगम " कर्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून बालकांना सामूहिक श्री हनुमान चालीसा पठाणाचे स्वरूप माहिती व्हावे व या माध्यमातून त्यांच्यात सद्गुणांचे बिजारोपण या बाल वयात व्हावे हा एकमात्र उद्देश लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

               

या मध्ये बालकांचा उत्साह वाढविण्याकरिता व त्यांना प्रोत्साहित करण्या करिता " वेशभूषा स्पर्धा " आयोजित करण्यात आली होती. यात 26 बालकांनी आकर्षक वेशभूषा सादर केली. यात भगवान श्रीकृष्ण, राधा, भगवान श्री शंकर , प्रभू श्रीराम, माता सीता, श्री सुदामा, मॉ. काली, श्री हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी, झाशी ची राणी यांच्या वेशभूषा करून सहभाग दर्शवीला. या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा उत्साह व आनंद द्विगुणित झाला.

                

या निमित्य महाप्रसाद चिमूर येथील प्रतिष्टीत सामाजिक कार्यकर्ते श्री. योगीनाथ प्रभाकरजी ठूने व श्री.भाऊराव कृष्णराव तुपे यांच्या संयुक्त परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला असून श्री.योगीनाथ प्रभाकरजी ठूने यांचा स्वागत सत्कार श्री.अनंताजी कामडी यांच्या वतीने करण्यात आला तथा श्री.भाऊराव कृष्णराव तुपे यांचा स्वागत सत्कार श्री.किशोरजी गुरले यांच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाला बाल,युवा, महिला व जेष्ठ नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !