महाराष्ट्र विद्यालय चा वार्षिक निकाल जाहीर.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ०८/०५/२५ शैक्षणिक सत्र २०२४ -२५ मधील वर्ग ५ ते ९ वी चा शालेय वार्षिक निकाल आज (दिनांक 8 मे २५) ला महाराष्ट्र विद्यालय पिंपळगावं (भोसले)ने जाहीर केला . शालेय निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम सकाळी ठीक ८-०० वाजता घेण्यात आला.
या निकाल प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री,ओमप्रकाश बगमारे मुख्याध्यापक साहेब व उपाध्यक्ष मा.श्री रुपेश पुरी सर हे होते.निकाल ऐकण्यासाठी उत्सुक असलेल्या उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुरी सर यांनी मूल्यमापन,अध्ययन या बाबत सविस्तर माहिती दिली.
या वेळी वर्ग - ५ ते ९ च्या वर्ग शिक्षकांनी आपापल्या वर्गाचा निकाल घोषित करून वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राजेश क-हाडे सर,सचिन क-हाडे सर,नाकाडे सर,महाले सर,सडमाके सर,राऊत मॅडम,मेश्राम सर,गावडकर सर,घ्यार सर,भुते मॅडम,महाजन सर , विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.