उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कांकेर ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने 3 प्रवासीचा मृत्यू ; 40 जण प्रवासी जखमी,11 गंभीर 8 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक.
एस.के.24 तास
देवरी : राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने मागून येणाऱ्या कांकेर ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने एका महिला प्रवासीचा जागीच मृत्यू झाला तर 40 प्रवासी जखमी झाले असून 11 गंभीर जखमींना गोंदिया येथे दाखल करण्यात आले.त्यापैकी दोघांचा गोंदिया येथून उपचारासाठी नागपूरला नेताना रस्त्यात मृत्यू झाला.
8 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.राष्ट्रीय महामार्ग 53 वर देवरी नजीक धोबीसराळ येथे गुरुवार मध्यरात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील जखमी व मृत हे छत्तीसगड कवर्धा,खैरागड येथील आहेत. हे सर्व प्रवासी मजूर असून मजुरी कामासाठी चंद्रपूर कडे जात होते.
प्राप्त माहितीनुसार देवरी पासून 2 कि.मी.अंतरावर असलेल्या धोबीसराड या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर इंधन संपल्याने बंद अवस्थेत ट्रक उभा होता.कवर्धा छत्तीसगढ येथून चंद्रपूर महाराष्ट्र येथे दररोज जाणारी कांकेर ट्रॅव्हल्स बस क्रमांक.CG .19 B.L.8001 हिने उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक.CG.04 NT. 5096 ला मध्यरात्री भीषण धडक दिली.या भीषण अपघातात 40 प्रवासी जखमी झाले.त्यात एक प्रवासी महिला सुनीता हेमलाल बघेले वय,35 वर्ष रा.खैरागढ हिचा जागीच मृत्यू झाला.तर अन्य 40 जखमी प्रवाशावर देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
त्यापैकी 11 गंभीर जखमी प्रवाश्यांना गोंदिया शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्यापैकी आठ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉ.येडे यांनी दिली आहे. या खाजगी बस मध्ये 50 च्या वर प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.ज्या 11 गंभीर जखमी रुग्णांना गोंदिया येथे दाखल करण्यात आले होते त्यापैकी दोन रुग्णांना नागपूरला उपचारासाठी नेताना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला.
उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स ने इतकी भीषण धडक दिली की या धडकेच्या आवाजामुळे धोबिसराड गावातील नागरिक धावून आले. पोलिसांना सूचना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.यावेळी प्रामुख्याने देवरी येथील हेल्पिंग ग्रूप च्या सदस्यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यास मदत केली.
मध्यरात्रीपासून सकाळ पर्यंत ग्रामीण रुग्णालयातील डॉ.अमित येडे व डॉ.नेहा मुलार यांनी 40 जखमीवर प्राथमिक उपचार केले.व जिल्ह्यातील सर्व 108 रुग्णवाहिकांना बोलावून 11 गंभीर जखमी रुग्णांना गोंदिया येथे पुढील उपचारासाठी पाठविले.दुर्घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.

