रेल्वे प्रकल्प हा तर अवैध उत्खननाचा मार्ग ; भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात...
📍ईटीएस मोजणी करणार म्हणून धास्ती.
एस.के.24 तास
यवतमाळ : रेल्वे प्रकल्पाच्या नावाखाली अवैध उत्खनन केल्याप्रकरणी अधिकारी कुठलीही कारवाई करण्यास तयार नाही. यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,याकरीता उपोषण सुध्दा केले.
दरम्यान प्रशासकीय कारवाई होत नसल्याने दोषी अधिकाऱ्यांविरोधात आता थेट फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वर्धा - यवतमाळ-नांदेड या नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या उत्खननातील गौण खनिज खुल्या बाजारात विकून करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडविण्यात आला. यामध्ये दर दिवशी संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी करोडो रुपयाची कमाई केल्याबाबत साक्षी पुराव्यानिशी तक्रार देण्यात आली आहे.
यामध्ये राजकीय तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे कुठलीच कारवाई होत नसल्याचे दिसून आले. अधिकारी फक्त आश्वासन देऊन प्रकरणाची चौकशी टाळत आहे.
यवतमाळ तसेच कळंब तालुक्यात उत्खननात कोट्यवधी रुपयांची कमाई केल्यानंतर आता असाच प्रकार जिल्ह्यातील उमरखेड व पुसद या भागात सुरू असल्याची तक्रार कोमावार यांनी केला आहे.
रेल्वे प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन होत असताना शासन आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही जाणीवपूर्वक कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी केला आहे.
महसूल व खनिज विभागातील काही अधिकारी-कर्मचारी ठेकेदारांसोबत संगनमत करून शासनाचा रोज लाखो रुपयांचा महसूल बुडवत असून नैसर्गिक संपत्तीचा विनाश होत आहेत.
उपोषण करून तसेच अनेक तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने अखेर राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांचेकडे निवेदन देऊन जिल्हा खणीकर्म अधिकारी, यवतमाळ, उपविभागीय अधिकारी,पुसद,उपविभागीय अधिकारी, उमरखेड
तहसीलदार,पुसद,तहसीलदार,उमरखेड तसेच इतर सर्व संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईची परवानगी अमोल कोमावार यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
ईटीएस मोजणीची धास्ती : -
ईटीएस ही जमिनीवरील उत्खननाची आधुनिक मोजणी पध्दत आहे. यामध्ये जमीन किती खोदली,माती किती हटवली यासह सर्वच अचूक माहिती समोर येते.
अधिकारी आणि कंत्राटदाराने संगनमत करुन कोटयवधी रुपयांचे गौण खनीज उत्खनन केले असल्यामुळे ईटीएस मोजणी केल्यास त्यांची पोलखोल होणार आहे.
त्यामुळेच अधिकारी ईटीएस मोजणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप अमोल कोमावार यांनी केला आहे. ईटीएस मोजणी करुन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी कोमावार यांनी केली आहे.