ग्रामपंचायत कार्यालय वढा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
एस.के.24 तास
चंद्रपूर : धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम पंचायत वढा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातही सुलभ,मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा होता.
हा उपक्रम मा. श्री.देवेश कुमार,मुख्य महाप्रबंधक, धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मा. डॉ. अनिश नायर, मुख्य व्यवस्थापक, धारिवाल, मा. श्री. रूपेश वैरागडे धारिवाल,मा.श्री. किशोर वरारकर सरपंच वढा यांची उपस्थिती होती.या उपक्रमात एकूण 65 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून औषधोपचाराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दिनेश कामतवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधुरी श्रीवास्तव,आशिष हलगे,राखी दुर्वे,धरती जोगी यांनी प्रयत्न केले.या उपक्रमामुळे गावकऱ्यांना प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले आहे.पुढील काळात असेच उपक्रम सातत्याने राबवले जावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.