भीषण अपघातात दुचाकी वरील पित्यासह दोन चिमुकल्याचा मृत्यू ; जेसीबीव्दारे मृतदेह बाहेर.

भीषण अपघातात दुचाकी वरील पित्यासह दोन चिमुकल्याचा मृत्यू ; जेसीबीव्दारे मृतदेह बाहेर.


एस.के.24 तास


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील साताळा बु. फाट्यावर एका मालमोटारीने दुचाकीवरील दोन चिमुकल्यांसह दाम्पत्याला सुमारे शंभर फुट फरपटत नेले.या घटनेत पतीसह दोन चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी या गंभीर जखमी झाली आहे. 


ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघाताची वडोदबाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गोपालसिंग मंगलसिंग चंदनशे वय,३५ वर्ष,हृदय गोपालसिंग चंदनशे वय,७ वर्ष व अवनी गोपालसिंग चंदनशे वय,९ वर्ष असे या अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. तर मीनाबाई गोपालसिंग चंदनशे या गंभीर जखमी झाल्या आहे.

गोपालसिंग मंगलसिंग चंदनशे हे वाळुंज येथील एका कंपनीला कामाला आहेत.शुक्रवारी त्यांच्या कंपनीला सुट्टी असल्याने ते आपल्या पत्नी व दोन चिमुकल्यांना घेऊन दुचाकीवरून (क्रमांक एम एच. ०२, सीसी ०२६३) फुलंब्री तालुक्यातील साताळा बुद्रुक येथे गांवी होते.

या दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील आळंद गावनजीक असलेल्या गणपती मंदिराजवळ गावाकडे जाण्यासाठी वळण घेत असतांना समोरुन भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्र. एम.एच.१९, सी एक्स २३७८) दुचाकीला जोराची धडक दिली. 

 यात मीनाबाई बाजूला फेकल्या गेल्या तर गोपालसिंग व हृदय आणि अवनीसह दुचाकी सुमारे शंभर फूट फरपटत गेली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

आळंद येथील बाजार असल्याने या घटनेची माहिती तत्काळ सर्वदूर पसरली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. फुलंब्री येथील महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिकेतून चालक विजय देवमाळी यांनी अपघातग्रस्त चौघानाही फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे हे करत आहे.

अपघातात ट्रकखाली दबलेल्या तिघांना शेकडो नागरिकांनी काढण्याचा प्रयत्न केला.परंतु ट्रकच्या मध्यभागी दुचाकी अडकल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. तेव्हा नागरिक व पोलिसांनी त्वरीत जेसीबी बोलावून त्याव्दारे ट्रक उचलून या दोन चिमुकल्यासह गोपालसिंग बाहेर काढले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !