अष्टविनायक भजन मंडळांचा श्रावणात गजर,रोज भक्ती रसपूर्ण भजनरजनी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : येथील कुर्झा वार्डातील अष्टविनायक भजन मंडळ कितीतरी दिवसांपासून प्रबोधन कार्यक्रम करीत असून सातत्याने भक्ती रसपूर्ण संतांची अभंग,राष्ट्रसंतांची भजने,एकनाथांच्या गौळणी - भारुड,संगीत नाटयगीते अशा बहुविध भक्तीप्रकाराचा आविष्कार करीत आहेत.
हा भजन मंडळ पंचक्रोशीतील प्रसिद्ध असून कार्यक्रम निमित्ताने ही मंडळी दूरवर भजनाला जात आहेत. याशिवाय अनेक भजन स्पर्धकांमध्ये त्यांनी लक्षवेधी भजने गाऊन बक्षिसं सुध्दा मिळवलेली आहेत.
या अष्टविनायक भजन मंडळात उत्कृष्ट पेटीवादक वाल्मीक बावनकुळे, तबलावादक संतोष कुर्झेकार,किशोर उराडे,मधुकर खेत्रे,अशोक उराडे,तुलाराम बावनकुळे, डॉ धनराज खानोरकर,पुंडलिक कामथे,राकेश वैद्य,राजू चिलबुले,ओमा फटिंग इत्यादी मंडळी भजन गाणारी आहेत.याच्यातील बहुतेक मंडळी शेतकरी असून दिवसभर शेतीत व रात्रो तीन तास भजनात रममाण असतात.
आता सुरु झालेल्या श्रावणात ही भजन मंडळी येथील गांधी चौकातील विठ्ठल - रुख्मिणी मंदिरात ध्वनिक्षेपकावर रोज नित्यनेमाने रात्रो ९.०० ते ११.३० वा.पर्यंत भक्ती रसपूर्ण भजनरजनी कार्यक्रम पार पाडीत असून वातावरण आनंददायी करीत आहेत.